भजनी मालिका
← भजनांकडे परत

धना जाट घरीं नित्य उभा हरी । एकनाथा घरीं धो-तरें धूत

dhana jat gharin nitya ubha hari | ekanatha gharin dho-taren dhut

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धना जाट घरीं नित्य उभा हरी । एकनाथा घरीं धो-तरें धूत ॥१॥ कबीराची पांजणी करी चक्रपाणी । जनीसवें शेणी वेचूं लागे ॥२॥ बोधल्याचें शेत पेरी श्रीअनंत । नामयासांगतें केशव हरी ॥३॥ गोर्‍या कुंभाराचीं मडकीं घडी अंगें । चोखामेळयासंगें ढोरें ओढी ॥४॥ रोहिदासाचें कुंड धुतो श्रीगोपाळ । सांवत्याचा ढोरें ओढी ॥५॥ नामा ह्मणे देव भक्तांचा वल्लभ । मागें पुढें उभा पांडुरंग ॥६॥