भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन कोणा कामा आलें। पहा विचारूनि भले

dhan kona kama alen| paha vicharuni bhale

रचनाकार: संत सेना · अभंग
धन कोणा कामा आलें। पहा विचारूनि भले ॥१॥ ऐसे सकळ जाणती । कळोनियां आंधळे होती ॥२॥ स्त्रिया पुत्र बंधु पाही। त्याचा तुझा संबंधु नाहीं ॥३॥ सखा पांडुरंगाविण। सेना म्हणे दुजा कोण ॥४॥