भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवावरी पाये ठेउनि खेंचर । निजेला परिकर निवांतचि

devavari paye theuni khenchar | nijela parikar nivantachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवावरी पाये ठेउनि खेंचर । निजेला परिकर निवांतचि ॥१॥ देखोनियां नामा पावला विस्मया । कैसा हा प्राणिया देवो नेणें ॥२॥ उठी उठी प्राण्या आंधळा तूं काये । देवावरी पाय ठेवियेले ॥३॥ विसोबा खेचर बोले नामदेवाअ । उठविले जिवा कांरे माझ्या ॥४॥ देवाविण ठाव रिता कोठें आहे । विचारुनि पाहे नामदेवा ॥५॥ जेथें देव नसे तेथें माझे पाय । ठेवीं पां अन्वय विचारुनी ॥६॥ नामा पाहे अवघा जिकडे तिकडे देव । कोठें रिता ठाव न देखेची ॥७॥