भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवकीचें तेज दिसे जैसा सूर्य । कंसाचें ह्लदय जळतसे

devakichen tej dise jaisa surya | kansachen hladay jalatase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवकीचें तेज दिसे जैसा सूर्य । कंसाचें ह्लदय जळतसे ॥१॥ हरणें पळती देखोनियां । व्याघ्र । कांपे थरथर तैशापरी ॥२॥ अजासर्पन्यायें कीटकभ्रमर । दिसती नारीनर कृष्णरूप ॥३॥ जेवि-तां बोलतां शेजे शीणें निज । आला आला मज मारावया ॥४॥ नाशील हा आतां दैत्याचें तें बंड । फाटलीसे गांड तेव्हां त्यांची ॥५॥ नामा ह्मणे भय लागलेंसे ध्यान । चराचरीं कृष्ण दिसतसे ॥६॥