भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवकी रोहिणी बळीराम वसुदेव । सुख्यासुखी सर्व आहेत की

devaki rohini baliram vasudev | sukhyasukhi sarva ahet ki

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवकी रोहिणी बळीराम वसुदेव । सुख्यासुखी सर्व आहेत की ॥१॥ पाहोनी तुज झालें समाधान । सुखी आहे कृष्ण मथुरेंत ॥२॥ आमुची एक कुंती आहे हस्तनापुरीं । स्मरे तो अं-तरी किंवा नाही ॥३॥ बहुता दिवसां तुज धाडिलें आक्रूरा । ह्मणोनि अंतरा सुख वाटे ॥४॥ माझिया बाळासी फार देती दु:ख । नाही मज सुख क्षणभरी ॥५॥ राजा पंडु आम्हां टाकूनियां गेला । रक्षी बाळकाला कोण आतां ॥६॥ नामा म्हणे ऐसें सांगतसे कुंती । शिंपियेली क्षिती आश्रुपातें ॥७॥