भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा आदिदेवा सर्वत्रांच्या जीवा । ऐकें वासुदेवा दयानिधी

deva adideva sarvatranchya jiva | aiken vasudeva dayanidhi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवा आदिदेवा सर्वत्रांच्या जीवा । ऐकें वासुदेवा दयानिधी ॥१॥ ब्रम्हा आणि इंद्रा वंद्य सदाशीवा । ऐकें वासुदेवा दीनबंधु ॥२॥ चौदा लोकपाळ करिती तुझी सेवा । ऐकें वासुदेवा कृपासिंधु ॥३॥ योगियांचे ध्यानीं नातुडसी देवा । ऐकें वासुदेव जगद्नुरु ॥४॥ निर्गुण निर्विकार नाहीं तुज माया । ऐकें वासुदेवा कानडिया ॥५॥ करुणेचा पर्जन्य शिंपी मज तोया । ऐकें वासुदेवा राया गोजरीया ॥६॥ नामा म्हणे जरी दाखविशील पाया । तरी वदावया स्फूर्ति चाले ॥७॥