भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव सांगे तुझी सामोग्री हे करा । सांगेन प्रकारा जाणो-नियां

dev sange tujhi samogri he kara | sangen prakara jano-niyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव सांगे तुझी सामोग्री हे करा । सांगेन प्रकारा जाणो-नियां ॥१॥ तेणें सर्व काज साधेल तुमचें । ठेविलें ठायींचे ठायीं पडे ॥२॥ घ्यारे आतां वरी मृत्तिका गाळुनी । सराटे वेंचुनी वोंटीं भरा ॥३॥ डांगा एक आणा वेंचुनीयां खडे । निघावें रोकडे एकसरा ॥४॥ नामा ह्मणे ऐसें ऐकतां गोपाळ । नाचती सकळ कृष्णापुढें ॥५॥