भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव खातें देव पितें । देवावरी मी निजतें

dev khaten dev piten | devavari mi nijaten

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
देव खातें देव पितें । देवावरी मी निजतें ।।१।। देव देतें देव घेतें । देवासर्वे व्यवहारितें ||२|| देव येथें देव तेथें। देवाविणें नाहीं रितें ॥३॥ जनी म्हणे विठाबाई भरूनि उरलें अंतरबाहीं ॥४॥