भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव आपण नाटक । भक्तां दाखवी वैकुंठ

dev apan natak | bhaktan dakhavi vaikunth

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देव आपण नाटक । भक्तां दाखवी वैकुंठ ॥१॥ देव आपण संसारें । होसी भक्तांचा साहकारी ॥२॥ देव आपण निराळा । भक्तां दावितो सोहळा ॥३॥ नामा ह्मणे भक्तांसाठीं । हात जोडी जगजेठी ॥४॥