भजनी मालिका
← भजनांकडे परत

देतां कांहींचि न घेती । भुक्ति मुक्ति रिध्दीसिध्दी

detan kanhinchi na gheti | bhukti mukti ridhdisidhdi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देतां कांहींचि न घेती । भुक्ति मुक्ति रिध्दीसिध्दी ॥१॥ म्हणोनियां संकट थोर । वाटे दुस्तर मज यांचें ॥२॥ वैकुंठासी नेऊं म्हणतां । विटती तत्वतां ऐकोनि ॥३॥ निळा म्हणे रंगले रंगी । माझिया निजांगी लिगटले ॥४॥