भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखोनियां त्याचा अंतर्भाव । वोळला देव कृपासिंधु

dekhoniyan tyacha antarbhav | volala dev krupasindhu

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देखोनियां त्याचा अंतर्भाव । वोळला देव कृपासिंधु ॥१॥ येऊनि जवळी ह्रदयीं धरी । आणि मुखीं भरी ब्रम्हारस ॥२॥ देऊनी विभाग आपला मान । करी वाढवून मान्य जगीं ॥३॥ निळा म्हणे ठाकूनि आलेला वेळ । आवडी गोपाळ आलिंगी त्या ॥४॥