भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखिला सुदामा आपुल्या नयनीं । मग चक्रपाणी उठे त्वरें

dekhila sudama apulya nayanin | mag chakrapani uthe tvaren

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देखिला सुदामा आपुल्या नयनीं । मग चक्रपाणी उठे त्वरें ॥१॥ सिंहासना खालीं टाकोनियां उडी । कर द्वय जोडी नमनालागीं ॥२॥ भेटूनियां तेव्हां धरिला हस्तकीं । बैसवी मंचकीं वैडुर्याच्या ॥३॥ म्हणे रुक्मिणीसी आणीं उदकाला । पुजूं या द्विजाला सन्मानेंसी ॥४॥ नामा म्हणे देवें चरण प्रक्षाळिले । आंचळीं पुसीले आपुलिया ॥५॥