भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह जावो अथवा राहो । पांडुरंगीं दृढ भावो

deh javo athava raho | pandurangin drudh bhavo

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देह जावो अथवा राहो । पांडुरंगीं दृढ भावो ॥१॥ चरण न सोडी सर्वथा । तुझी आण पंढरीनाथा ॥२॥ वदनीं तुझें मंगळनाम । अखंड सदोदित प्रेम ॥३॥ जैसा तैसा असेल भाग । तैसा तैसा घडेल योग ॥४॥ नामा म्हणे केशवराजा । केला पण चालवी माझा ॥५॥