भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह जन्मला व्यर्थ । झाले पापांचे पर्वत

deh janmala vyartha | jhale papanche parvat

रचनाकार: संत नरहरी · अभंग
देह जन्मला व्यर्थ । झाले पापांचे पर्वत ॥ १ ॥ दान धर्म नाहीं केला । शेवटीं जन्म व्यर्थ गेला ॥ २ ॥ देह अवघा क्षणभंगुर । दिसे स्वप्नवत् सार ॥ ३ ॥ नरहरी ह्मणे शेवटीं । संगें न येई लंगोटी ॥ ४ ॥