भजनी मालिका
← भजनांकडे परत

डवरला गिरी कैलास ढवळा । सिंहासन ज्याला ढव-ळेची

davarala giri kailas dhavala | sinhasan jyala dhav-lechi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
डवरला गिरी कैलास ढवळा । सिंहासन ज्याला ढव-ळेची ॥१॥ पाहतां पाहतां निवाले लोचन । भव्य ज्याचें ध्यान एक-रूप ॥२॥ ढवळा सर्वांगीं देव तो आपण । लेइला भूषण तेंहि तैसें ॥३॥ पर्वताची बाळ पार्वती ढवळी । अर्धांगीं शोभली एकरूप ॥४॥ स-र्वांगीं लविली ढवळी विभूती । माळा विराजती स्फटिकाच्या ॥५॥ पांढरिया जटेमध्यें गंगा आहे श्वेत । गळ्यांत सोभत श्वेत सर्प ॥६॥ शंखपाळ श्रवणें कुंडलें ढवळीं । देखतां भूतळीं दुजा नाहीं ॥७॥ नामा ह्मणे ऐसें दाऊनियां ध्यान । भाविकाचें मन तोषवित ॥८॥