भजनी मालिका
← भजनांकडे परत

दामोदरा केशवा वामना देवा कृष्णा । परंज्योति नारायणा तुज नमो

damodara keshava vamana deva krushna | paranjyoti narayana tuj namo

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दामोदरा केशवा वामना देवा कृष्णा । परंज्योति नारायणा तुज नमो ॥१॥ विश्वव्यापका जनार्दना वासुदेवा निर्गुणा । अव्यया जगजीवना तुज नमो ॥२॥ अनंत अवतार घेसी भक्तां-साठीं । कृपाळु जगजेठी तुज नमो ॥३॥ यज्ञेशा सर्वेशा दयानिधि ह्लषिकेशा । पुराणपुरुषा तुज नमो ॥४॥ धन्य हा दिवस देखिले तुझे पाय । कृपादृष्टी पाहें आह्मांकडे ॥५॥ जोडोनियां हात करिती विनंति । देईं तुझी भक्ति जन्मोजन्मीं ॥६॥ करूनि नमस्कार हळू-हळू चालती । वेळोवेळां पाहाती कृष्णाकडे ॥७॥ मोडतांचि वक्ष नाद ऐकूनियां येती । धांवोनि पहाती नामा ह्मणे ॥८॥