भजनी मालिका
← भजनांकडे परत

दहीं दूध तूप लोणी

dahin dudh tup loni

रचनाकार: संत निळोबा · अभंग
दहीं दूध तूप लोणी । आणि दुधाणी चोरुनी ॥१॥ म्हणे घ्यारे पोटभरी । आपणहि स्वीकारी त्यांसवे ॥२॥ नाचे हातीं लोणीया गोळे । नाचवी गोवळें भोंवताली ॥३॥ निळा म्हणे चाहाळी करी । रिचवी वरी आणि हांसे ॥४॥