भजनी मालिका
← भजनांकडे परत

दग्धही होतसे आलें जें आकारा । असोनि निर्धारा नाम नाहीं

dagdhahi hotase alen jen akara | asoni nirdhara nam nahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दग्धही होतसे आलें जें आकारा । असोनि निर्धारा नाम नाहीं ॥१॥ नाम अनुभवे प्रपंचि हो ब्रह्म । जाहला सर्वोत्तम संत कृपें ॥२॥ म्हणोनियां संतां जाऊनि शरण । साधावें निधान नाम ब्रह्म ॥३॥ नामदेव म्हणे संताचिया कृपं । माजीं नाम सोपें नांदतसे ॥४॥