भजनी मालिका
← भजनांकडे परत

चुकलीया चुके

chukaliya chuke

चुकलीया चुके । आपादिलिया भलें होय । तरी दु:ख दारिद्र भोगी कवण । तरि अवघेंचि विश्व कां सुखी नव्हे रया ॥१॥ म्हणोनियां भ्रम सांडी नाथिला । जें जें कांहीं करीन म्हणसी होणार तें होईल । न होणार तें नव्हेल । तूं फ़ुकाचि नाडसी रया ॥२॥ होणें न होणें निढळींच्या अक्षरीं । वोरबार करसील काह्या । पाईक वोळगे अठैप्रहर सेखीं दैव तंव आणील ठायां रया ॥३॥ देखणें डोळा ऐकणें कानीं । जिव्हे कडु रस मधुर वाणी श्वासोश्वास हे जयाची करणी । अनुभवी जाणती ज्ञानी ॥४॥ नाथिलाचि धिंवसा करुं पाहासी । दुराशा जवळि असतां । आकाश झोंबतोसी । आतांचे चिंतिलें आतांचि न पाविजे । पुंढें कोण जाणे काय पावसी रया ॥५॥ उपजत देहे मृत्युमुखीं पडलें । मी माझें करिसी किती । उठी उठी जागे आपुलिया हिता । बापरखुमादेविवराविठ्ठलाची करी भक्ति रया ॥६॥