भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्तीं तुझे पाय डोळां रूपाचें ध्यान

chittin tujhe pay dolan rupachen dhyan

चित्तीं तुझे पाय डोळां रूपाचें ध्यान । अखंड मुखीं नाम तुमचे वर्णावे गुण ॥१॥ हें चि एक तुम्हां देवा मागणें दातारा । उचित तें करा माझा भाव जाणूनि ॥ध्रु.॥ खुंटली जाणींव माझें बोलणें आतां । कळो यावी तैसी करावी बाळकाची चिंता ॥२॥ तुका म्हणे आतां नको देऊं अंतर । न कळे पुढें काय बोलों विचार ॥३॥