भजनी मालिका
← भजनांकडे परत

छेदियेला वृक्ष तुटलें तें मूळ

chhediyela vruksha tutalen ten mul

छेदियेला वृक्ष तुटलें तें मूळ । प्रपंच समूळ उडोनि गेला ॥ १ ॥ गेलें तें सुमन गेला फुलहेतु । अखंडित रतु गोपाळीं रया ॥ २ ॥ सांडिला आकारु धरिला विकारु । सर्व हरिहरु एकरूपें ॥ ३ ॥ निवृत्ति निधान वोळले गयनी । अमृताची धणी आम्हां भक्ता ॥ ४ ॥