भजनी मालिका
← भजनांकडे परत

चवाळ्याची सांगेन मातु

chavalyachi sangen matu

चवाळ्याची सांगेन मातु ॥ चवाळें पांघुरे पंढरीनाथु ॥१॥ गोधनें चारितां हरि पांघुरला । मज चवाळ्याचा त्यागु पैं दिधला ॥२॥ बाप रखुमादेविवरु श्रीगुरुराणा । चवाळें पांघुरवी निरंजनागे माये ॥३॥