भजनी मालिका
← भजनांकडे परत

चौर्‍यांयशी लक्ष्‍ा योनीप्रती । फेरे खाती यातना

chaur‍yanyashi laksh‍a yoniprati | phere khati yatana

रचनाकार: संत निळोबा · अभंग
चौर्‍यांयशी लक्ष्‍ा योनीप्रती । फेरे खाती यातना ॥१॥ संकटापासूनि सोडविता । कोण हो होता देवावीण ॥२॥ निष्काम करुनी ठेवितां दासा । कोण हो होता ऐसा देवावीण ॥३॥ निळा म्हणे निर्लोभ शांती । कोण देतां हातीं भक्तांचिये ॥४॥