भजनी मालिका
← भजनांकडे परत

चौर्‍यांसि लक्ष योनि क्रमुनि सायासीं

chaur‍yansi laksha yoni kramuni sayasin

चौर्‍यांसि लक्ष योनि क्रमुनि सायासीं । नरदेहा ऐसें भांडवल पावलासी । जतन करीरे गव्हारा । भजे न भजे या संसारा । बीज सांडूनि असारा वायां झोंबतोसी ॥१॥ हातींचिया लागीं भूमि चाळितासी । आप नेणतां तूं पर काय चिंतिसी मन एक स्वाधीन तरी खुंटलें साधन । सर्व सुखाचें निधानहरि पावसी रया ॥२॥ तृणें पशु झकविले ते क्षीरातें । तैसा विषय पाल्हाळें निज चुकलासी । कोटि युगें जन्मवरी । येतां जातां येरझारीं । दु:ख भोगिसी दुर्धर रया ॥३॥ पुत्रकलत्र भवविभव विचित्र । होय जाय सूत्र तूं आप न म्हण । तुझा तूंचि नाहीं ऐसें विचारुनि पाहीं । चेतवी चोरलासी वेगीं सावध होई रया ॥४॥ तुज नाथिलाचि धिवसा । आस्तिकपणाच्या आशा । असते सांडूनि आकाशा । वायां झोंबतोसी । दिवस आहे तो धांवावे । नाहीं तरी फ़ुटोनि मरावे । मृगजळ हें अघवे पाहे रया ॥५॥ स्वप्नीं साचचि जोडे । थोडें ना बहुत हातां सांपडे । तुटले प्रीतीचे कुवाडे । ऐसें जाणोनिया शरण जाई निवृत्ति । तो सोडविल संसृति । बापरखुमादेविवरा विठ्ठलाचे भक्ति रया ॥६॥