भजनी मालिका
← भजनांकडे परत

चौर्‍यांशी लक्ष हिंडता हाट

chaur‍yanshi laksha hindata hat

चौर्‍यांशी लक्ष हिंडता हाट । पुंजे दाट सांपडलें ॥ हित ये खेपेसी बरवें जालें । सुरंग घोंगडें हाताशीं आलें ॥ध्रु०॥ येणें पाडें न माये कोठें । घोंगडें मोठें सांपडलें ॥२॥ मनोरथ पुरलेरे आतां । बापरखुमादेविवरा विठ्ठलाशी ध्याता ॥३॥