भजनी मालिका
← भजनांकडे परत

चौदाशें वरुषें शरीर केलें जतन । बोधाविण शिण वाढविला

chaudashen varushen sharir kelen jatan | bodhavin shin vadhavila

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चौदाशें वरुषें शरीर केलें जतन । बोधाविण शिण वाढविला ॥१॥ नाहीं गुरुमंत्र नाहीं उपदेश । परमार्थासि दोष लावियेला ॥२॥ स्वहिताचें कारण पडियेलेंज जेव्हां । शरण आला तेव्हाम आळंकापुरीं ॥३॥ गैनीनाथें गुज दिलें निवृत्तीला । निवृत्तीचा जाला ज्ञानदेव ॥४॥ ज्ञानदेवें बीज वाढविलें जनीं । तेंचि आम्हीं तुम्हीं संपादिलें ॥५॥ म्हणे मुक्ताबाई तिहीं लोकीं ठसा । नामदेव ऐसा राहिला कां ॥६॥