भजनी मालिका
← भजनांकडे परत

चौदाजणी ज्याच्या चरणातें पूजिती । त्याची घेईन माती आपुल्या शिरीं

chaudajani jyachya charanaten pujiti | tyachi ghein mati apulya shirin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चौदाजणी ज्याच्या चरणातें पूजिती । त्याची घेईन माती आपुल्या शिरीं ॥१॥ एकांतीं अर्चन करिती धूर्जटी । त्यांसी बोलेन गोष्टी आवडीनें ॥२॥ सप्तऋषि ज्याचे वर्णिताताती गुण । करीतसे ध्यान ब्रह्मा ज्याचें ॥३॥ चारी वेद ज्याची वर्णिताती कीर्ति । करिताती स्तुति साहीजण ॥४॥ तेहेतीस कोटि देव जयातें पूजिती । श्रुति वर्णिताती गुण ज्याचे ॥५॥ लक्षुमीचा पति ध्याती सनकादिक । पाहीन श्रीमुख एकवेळां ॥६॥ पृथ्वीचा हा भार करावया दूर । ह्मणोनि अवतार वेत असे ॥७॥ नामा ह्मणे आला यमुनेजवळी । उतरला खालीं रथाचिया ॥८॥