भजनी मालिका
← भजनांकडे परत

चौ तेरा आम्ही चौसष्टीचे भागे सांचिले

chau tera amhi chausashtiche bhage sanchile

चौ तेरा आम्ही चौसष्टीचे भागे सांचिले । तें एका ऋणाईतें घेतलें वोळखीविण ॥१॥ आपुलें अकरावें एक सोईरें जाणा । तेंहीं पैं तयासि मिळोनि ठेलें ॥२॥ आतां मी चौघांपाशीं जाईन तिहींचि नागविले पाहीं । तेथें कांहीं नाहीं ऐसें म्हणितलें ॥३॥ ऐसा देहाचा दिवाळखोर दुसर्‍यासी घेऊनी गेला । तेणें मज दाखविला अद्वैत पारु ॥४॥ सहस्त्रापरि कांही धरियेली जरी । ज्ञानमूढें तरी कायि जाणती ॥५॥ ऐसा बापरखुमादेविवरु विठ्ठलु मध्यावर्ती भला । तेणें उगाणा केला परावृत्त होऊनियां ॥६॥