भजनी मालिका
← भजनांकडे परत

चंद्र्भागतीरीम उभा राहिलासी । भक्तांचे मानसीं भाव मात्र

chandrbhagatirim ubha rahilasi | bhaktanche manasin bhav matra

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चंद्र्भागतीरीम उभा राहिलासी । भक्तांचे मानसीं भाव मात्र ॥१॥ काय पुंडलिकें केल्या तपरासी । जाणोनि मानसीं भावमात्रें ॥२॥ भावेंविण देवा सर्वथा नातुडे । नेणती बापुडे बद्धजन ॥३॥ नामा म्हणे माझें माहेर पंढरी । भेटती महाद्वारीं संतजन ॥४॥