भजनी मालिका
← भजनांकडे परत

चंद्रा पूर्णिमे पूर्ण शोभा

chandra purnime purna shobha

चंद्रा पूर्णिमे पूर्ण शोभा । कळा तुटलिया कैची तेथें प्रभा ॥१॥ तैसा कां गा निकुर वृत्ती करिसी । सर्वाठायीं विभांडिसी गा देवा ॥२॥ कापुरें दुतीसी रुसणें केलें ती । तरि सांगपा कवणाचें काय गेलें ॥३॥ तरंगु निमालिया जळासागरु सागरसि नाही दुसरा उपचारु ॥४॥ शिरा शरीरीं एक वंकीं जैसी । आतां तुझ्या पायीं आम्हा पाइकी तैसी गा देवा ॥५॥ रखुमादेविवरा विठ्ठला राणे राया । मी न बोलें तरि बोलें काजा तुझिया गा देवा ॥६॥