भजनी मालिका
← भजनांकडे परत

चैतन्य चोरुनि नेलें चित्त माझें सवें गेलें

chaitanya choruni nelen chitta majhen saven gelen

चैतन्य चोरुनि नेलें चित्त माझें सवें गेलें । पाहे तंव तंव तन्मय जालें गे माय ॥१॥ देवें नवल केलें मन माझें मोहिलें । विसरु तो आठऊ जालागे माये ॥२॥ यासी जाणावयालागी अनुउते पाहे । तंव त्रिभुवन तन्मय जालेंगे माये ॥३॥ बापरखुमादेविवरें विठ्ठलरायें । माझें सबाह्यभ्यंतर व्यापिलेंगे माय ॥४॥