भजनी मालिका
← भजनांकडे परत

चहूंकडे स्वर गाताती गायनें । आणिक पुराणें ठाईठाईं

chahunkade svar gatati gayanen | anik puranen thaithain

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चहूंकडे स्वर गाताती गायनें । आणिक पुराणें ठाईठाईं ॥१॥ गीतनृत्य नाना करिती तनाना । होतसे झणाणा टाळघोळ ॥२॥ श्रवणाचें सुख घेतसे ब्राम्हण । नामाही गर्जना करीतसे ॥३॥