भजनी मालिका
← भजनांकडे परत

चहूं शून्याआरुतें महाशून्यापरुतें

chahun shunyaaruten mahashunyaparuten

चहूं शून्याआरुतें महाशून्यापरुतें । सर्वांसी पहातें तेंची तें गा ॥१॥ दिसे तेंही शून्य पहा तेही शून्य देहामजी निरंतर भिन्न रुप ॥२॥ शून्य निरशून्य दोन्ही हारपलीं । तेथूनी पाहिली निजवस्तु ॥३॥ ध्येय ध्यान ध्याता निरसुनी तिन्ही । झालों निरंजनी अति लीन ॥४॥ ज्ञानदेव म्हणे अनुभवी तो जाणें । गुरुमुखें खुण सांगितली ॥५॥