भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रम्हसंपत्ती वरी तया । आवडे जया संतसंग

bramhasampatti vari taya | avade jaya santasang

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ब्रम्हसंपत्ती वरी तया । आवडे जया संतसंग ॥१॥ त्रिकाळज्ञानी होय तो नर । आत्मसाक्षात्कार भोगप्राप्ती ॥२॥ शांति दया क्षमा सिध्दी । बोलतां समाधी चालतां त्या ॥३॥ निळा म्हणे एवढा लाभ । जोडे त्या स्वयंभ भागयवंता ॥४॥