भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मियाचा अवतार । तो हा सोपान निर्धार

brahmiyacha avatar | to ha sopan nirdhar

रचनाकार: संत सेना · अभंग
ब्रह्मियाचा अवतार । तो हा सोपान निर्धार ॥१॥ याचे घेतां मुखीं नाम । हरे सकळही श्रम ॥२॥ समाधीपासुनी भागीरथी । स्नानालागी नित्य येती ॥३॥ अष्टोत्तर तीर्थाचा मेळा । नाम कऱ्हाबाई वेल्हाळा ॥४॥ वैष्णवांमाजी डिंगर । सेना तयाचा किंकर ॥५॥