भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मीं ब्रह्म होणें हें तो कठीण सांगता

brahmin brahma honen hen to kathin sangata

ब्रह्मीं ब्रह्म होणें हें तो कठीण सांगता । आब्रह्मीता जयाचिया सत्ता विस्तारले ॥१॥ सांगतां नये सांगावें तें काय । तेथील हे सोय गुरुखुणा ॥२॥ मन हें अमोलिक जरि गुंपे अमूपा । तरिच हा सोपा मार्ग रया ॥३॥ बापरखुमादेविवरु ब्रह्मविद्येचा पुतळा । तेथील हे कळा निवृत्तिप्रसादें ॥४॥