भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मांडनायक विश्वाचा गोसावी । तो केला पांडवी म्हणियारा

brahmandanayak vishvacha gosavi | to kela pandavi mhaniyara

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ब्रह्मांडनायक विश्वाचा गोसावी । तो केला पांडवी म्हणियारा ॥१॥ भावाचा लंपट भक्ताम पराधीन । सोडोनी अभिमान दास्य करी ॥२॥ भाजीचिया पाना संतोषला हरी । जयाचे उदरीं चौदा भुवनें ॥३॥ जनक श्रुतिदेवेम धरियेला करीं । दोघांचिये घरीम घेतो पूजा ॥४॥ पुंडलिकें वीट बैसावया नीट । तेथें भूवैकुंठ वसतें केलें ॥५॥ नामा म्हणे शरण रिघतां एक्याभावें । कैवल्य भोगावें नामामात्रें ॥६॥