भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्राह्मण हो शूद्र वैश्य नारीनर । सर्वांसी आधार नाम सत्य

brahman ho shudra vaishya narinar | sarvansi adhar nam satya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ब्राह्मण हो शूद्र वैश्य नारीनर । सर्वांसी आधार नाम सत्य ॥१॥ नामविण गति नाहीं हो आणीक । वैकुंठनायक बोले मुखें ॥२॥ परी तेंचि नाम पाहावें शोधून । चौर्‍यांशी खाणी चुके तेव्हां ॥३॥ नामदेव म्हणे सद‌गुरुपासोनी । नाम घ्या शोधूनि भावमुक्त ॥४॥