भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्राह्मण आशिर्वाद देती । नंदा पुसोनि निघती

brahman ashirvad deti | nanda pusoni nighati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ब्राह्मण आशिर्वाद देती । नंदा पुसोनि निघती ॥१॥ चलाचला म्हणती लोक । पाहूं नंदाचें बालक ॥२॥ नरनारी हो अलं-कार । शृंगारिलें सर्वपूर ॥३॥ दैन्य दारिद्र अपेश । पळती मानू-नियां त्रास ॥४॥ आणिताती बाळलेण । स्त्रिया पाहताती कृष्ण ॥५॥ नामा ह्मणे पाहतां मुख । देहभाव जाय सकळीक ॥६॥