भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मज्ञानी पुरुष तोचि ओळखावा

brahmadnyani purush tochi olakhava

ब्रह्मज्ञानी पुरुष तोचि ओळखावा । नयनांजनीं पाहावा ब्रह्मठसा ॥१॥ देखतसे देहीं द्वैत भेदातीत । तोची धन्य संत माझे मनीं ॥२॥ त्याचे चरणोदकीं जान्हवी पवित्र । सहस्त्रदळावर लक्ष ज्याचें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे ऐशा योगीयाला । देखतां तयाला नमन माझें ॥४॥