भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मादिकां पाहतां ठक पडियंलें । पहाहो कैवल्य गौ-ळिया जोडलें

brahmadikan pahatan thak padiyanlen | pahaho kaivalya gau-liya jodalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ब्रह्मादिकां पाहतां ठक पडियंलें । पहाहो कैवल्य गौ-ळिया जोडलें ॥१॥ कोण्या ऋणें या केला नकळे । परब्रह्म आमुचें आहे सोंवळें ॥२॥ या गोकुळाचेनी पाडे पाहतां । सुख वैकुंठीं न दिसे सर्वथा ॥३॥ ऐसा अभिनव आनंदु जाणतो । गोकुळींचें तृण तरुवर तरी होतों ॥४॥ कामक्रोध लवियेला येणें निवे । तेणें सुखें शुद्ध लागलीसे सवें ॥५॥ नामया स्वामी ह्लदयीमचा विसांवा । आपुलें सर्वस्व देऊनियां जोडावा ॥६॥