भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मादिक पडती पायां । जे शरण पंढरीराया

brahmadik padati payan | je sharan pandhariraya

रचनाकार: संत सेना · अभंग
ब्रह्मादिक पडती पायां । जे शरण पंढरीराया ॥१॥ मोक्ष मुक्ती लोटांगणीं । उभ्या तिष्ठती आंगणीं ॥२॥ सूर्यसुत शरणागत । येउनी चरणीं लागत ॥ ३॥ काया मने वाचा। सेना शरण विठोबाचा ॥४॥