भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलूं ऐसे बोल । जेणें बोलें विठ्ठल डोले

bolun aise bol | jenen bolen viththal dole

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बोलूं ऐसे बोल । जेणें बोलें विठ्ठल डोले ॥१॥ प्रेम सर्वांगाचे ठायीं । वाचे विठ्ठल रखुमाई ॥२॥ परेहूनि परतें घर । तेथें राहूं निरंतर ॥३॥ सर्वांचें जें अधिष्ठान । तेंचि माझें रूप पूर्ण ॥४॥ नाचूं कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावूं जगीं ॥५॥ सर्व सत्ता आली हातां । नामयाचा खेचर दाता ॥६॥