भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोले दामसेठी । नाम्या ऐकावी हे गोष्टी

bole damasethi | namya aikavi he goshti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बोले दामसेठी । नाम्या ऐकावी हे गोष्टी ॥१॥ पाहे संसाराची सोये । हाटा बाजारासी जाये ॥२॥ कुटुंब चालवणें तुज । वृद्धपण आलें मज ॥३॥ तुजसाठीं नवस केलाअ । सेखीं हाचि कामा आला ॥४॥ दामा म्हणे नामयासी । किती शिकवावें तुजसी ॥५॥