भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलती बोलणें चालती चालणें । करिती देणें घेणें परि तो ध्यानीं

bolati bolanen chalati chalanen | kariti denen ghenen pari to dhyanin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बोलती बोलणें चालती चालणें । करिती देणें घेणें परि तो ध्यानीं ॥१॥ जेविती जेवणीं खेळत खेळणीं । मिरविती भूषणें परि चित्त तेथें ॥२॥ गीतीं गाती गीत विनोदीं हांसती । रुदनीं रुदत परि त्या कृष्णीं ॥३॥ निळा म्हणे सुखें भोगिती नानाभोग । परि त्यांचे श्रीरंग ध्यानी मनीं ॥४॥