भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलणें त्याचें तें नि:शब्द । देखणें देखती सच्चिदानंद । करणें चाळितां आत्मबोध । विषयीं विषय बहमरुप

bolanen tyachen ten ni:shabda | dekhanen dekhati sachchidanand | karanen chalitan atmabodh | vishayin vishay bahamarup

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बोलणें त्याचें तें नि:शब्द । देखणें देखती सच्चिदानंद । करणें चाळितां आत्मबोध । विषयीं विषय बहमरुप ॥१॥ जाणें येणें आणिकां दिसें । अचळपणें तें जैसें तैसें । कल्लोळ सागरीं उससे । रश्मि जैसे निजबिंबीं ॥२॥ न मोडे त्या अखंडता । घेतां देतां सर्वही करितां । हांसतां खेळतां बोलतां । निजीं निजतां यथासुखें ॥३॥ लेणीं अळंकारहि मिरविती । जयापरि तैसेचि दिसती । न मोडतां स्‍वरुपस्थिति । चित्तीं चितंन सर्वदा ॥४॥ निळा म्हणे गुणातीत । देहीं देहातें नातळत । होऊनियां ठेले संत । अंखटित अखंडीं ॥५॥