भजनी मालिका
← भजनांकडे परत

बिंबीं बिंबीं येक बिंबलें सम्यक

bimbin bimbin yek bimbalen samyak

बिंबीं बिंबीं येक बिंबलें सम्यक । आपण तिन्हीलोक एक्यारूपें ॥१॥ तो कृष्णरूप ठसा गोपाळां लाधला । सर्वत्र देखिला चतुर्भुज ॥२॥ निळिमा अंबरीं निजवर्ण तेज । गोपाळ सहज बिंबाकार ॥३॥ निवृत्ति परिपाठा नीळवर्ण खरा । नंदाचिया घरा कृष्ण आले ॥४॥