भजनी मालिका
← भजनांकडे परत

बिभिषण भावें शरण आला परी

bibhishan bhaven sharan ala pari

रचनाकार: संत रामदास · अभंग
बिभिषण भावें शरण आला परी । तुज सिंधुतीरीं ऐकुनिया तात्काळचि तुवां आश्वासिलें त्यासी। तैसें हें आम्हासीं कैचे रामा धारिष्ट आमुचें पाहे सर्वोत्तमा । कलियुगींचे रामा दास तुझे दर्शन सुग्रीवा आधीं सौख्य दिले। मग तेणे केले दास्य तुझे तुजलागीं प्राण वेंचिलें वानरीं । परि तूं धनुर्धारी पाठीराखा तुझे रुप द्रुष्टीं नसोनियां ठावें । नामीं सर्वभावें विश्वासलों सकळांहूनि साना रामदास जालों । परिवारेंसि आलो शरण तुज।