भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूमिदानें होसी भूमिपाळु । कनकदानें कांति निर्मळु । चंदनदानेम सदा शीतळु । जन्मोजन्मीं प्राणिया

bhumidanen hosi bhumipalu | kanakadanen kanti nirmalu | chandanadanem sada shitalu | janmojanmin praniya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भूमिदानें होसी भूमिपाळु । कनकदानें कांति निर्मळु । चंदनदानेम सदा शीतळु । जन्मोजन्मीं प्राणिया ॥१॥ अन्नदाने दृढा-युषी । उदकदानें सदासुखीं । मंदिरदानें भुवनपालखी । सुपरिमळू उपचारां ॥२॥ वस्त्रदानें सुंदरपण । तांबूलदानें मनुष्यपण । गोपी-चंदनें ब्राह्मणपण । अतिलावण्य सुंदरता ॥३॥ जे वृक्ष लविती सर्वकाळ । तयावरी छत्रांचें झल्लळ । जे ईश्वरीं अर्पिती फळ । नाना-विध निर्मळ ॥४॥ ऐशा दानाचिया पंक्ति । वेगळाल्या सांगों किती । एका ध्यारे लक्ष्मीपति । विष्णुदास ह्मणे नामा ॥५॥