भजनी मालिका
← भजनांकडे परत

भुलविले ह्यांनी भस्मासुर दैत्याशी

bhulavile hyanni bhasmasur daityashi

रचनाकार: संत संताजी · अभंग
भुलविले ह्यांनी भस्मासुर दैत्याशी । आणिक नारदाशी त्याच रीती ।।१।। ब्रम्हदेवा आणि विश्वाही मिञाशी । तसेच भुलविले इंद्रा आणि चंद्राशी ।।२।। संतु म्हणे अशा ह्या घाण्याच्या पाचरी । काढाव्या वेगशी देहातुनी ।।३।।